महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'न्यायानं कधी बदल्याची जागा घेऊ नये; त्यामुळे न्यायाचं महत्त्व कमी होतं'

हैदराबाद आणि उन्नावमधील घटनेनंतर तर ढासळेलल्या कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी न्यायदान प्रक्रियेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

सरन्यायाधीश एस. ए. बोबडे
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे

By

Published : Dec 7, 2019, 4:37 PM IST

Updated : Dec 7, 2019, 7:33 PM IST

जयपूर - महिलांवरील बलात्कार आणि अत्याचाराच्या घटनांनी देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. हैदराबाद आणि उन्नावमधील घटनेनंतर तर ढासळेलल्या कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी न्यायदान प्रक्रियेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

'झटपट न्याय दिला जावा, असे मला कधीही वाटत नाही. तसेच न्यायाने कधीही बदल्याची जागा घ्यायला नको. जेव्हा न्याय बदल्याची जागा घेतो, तेव्हा न्यायाचे महत्त्व कमी होते', असे सरन्यायाधीश म्हणाले. जयपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

हेही वाचा -जया बच्चन व स्वाती मलिवाल यांच्यावर कारवाई करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका


यावेळी त्यांनी न्यायदान देण्यास होत असलेल्या दिरंगाईवरही मत व्यक्त केले. देशामध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे न्यायदान प्रक्रियेचा सर्वंकष पुन्हा विचार व्हायला हवा. गुन्हे निपटण्यास लागणारा वेळ किती असावा? याचाही विचार करण्याची वेळ आली असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. न्यायदान प्रक्रियेस लागणारा वेळ हा जुना वादाचा मुद्दा आहे. मात्र, नुकत्याच घडलेल्या घटनांमुळे पुन्हा नव्या जोमाने हा वाद सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले.

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी चकमकीत ठार मारले. त्यावरून देशभरामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी पीडितेला त्वरीत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे, तर काहींनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. उन्नावमधील पीडितेलाही असाच न्याय मिळावा, अशी मागणी होत आहे. हैदराबाद घटनेत न्यायव्यवस्थेला डावलून आरोपींची हत्या करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा -बुलंदशहर : १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 4 अल्पवयीन मुलांना अटक

Last Updated : Dec 7, 2019, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details