नवी दिल्ली- नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आज (बुधवारी) राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकावर राज्यसभेत 6 तास चर्चा होणार आहे. लोकसभेत या विधेयकाच्या बाजुने 311 मतं मिळाली होती.
Citizenship Amendment Bill : मोदी सरकारची आज राज्यसभेत अग्निपरीक्षा, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असले, तरी राज्यसभेत आज मोदी सरकारची खरी परीक्षा असणार आहे. लोकसभेत बहुमत असल्याने विधेयक मंजूर झाले. मात्र, राज्यसभेत सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे आज राज्यसभेत शिवसेना काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोळाव्या लोकसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले होते. मात्र, सोळाव्या लोकसभेचा कार्यकाळ संपून गेला, तरी मोदी सरकारला राज्यसभेत हे विधेयक मंजूर करता आले नव्हते. आता लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.