तिरुवअनंतपूरम -केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने(सीआयएसएफ) आज (मंगळवार) कोचिन विमानतळावर ५ किलो गांजा जप्त केला. सामानाची तपासणी करत असताना सीआयएसएफने हा गांजा जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
केरळ : कोचिन विमानतळावर ५ किलो गांजा जप्त - गांजा जप्त केरळ बातमी
शाजीर अहमद(३६) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे हे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आले आहे.
शाजीर अहमद
शाजीर अहमद(३६) या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडे हे प्रकरण हस्तांतरीत करण्यात आले आहे. सीआयएसएफ अधिकाऱ्याने सांगितले की, सामानाची तपासणी करत असताना एका जवानाला प्रवाशाच्या बॅगमध्ये संशयास्पद वस्तू असल्याचा अंदाज आला. नंतर नीट तपासणी केली असताना चार पॅकेटमध्ये पाच किलो गांजा आढळून आला. पुढील तपासासाठी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.