नवी दिल्ली -चेन्नई विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याकडून 'सीआयएसएफ' विभागाने १००-१०० ग्रॅमचे २४ सोन्याचे बिस्कीट (गोल्ड बार) जप्त केले आहे. हे सोने २.४ किलो वजनाचे असून याची किंमत १ कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे.
चेन्नई विमानतळावर कर्तव्यावर असलेल्या हाऊसकीपिंग स्टाफची एक महिला कर्मचारी सीआयएसएफ विभागाला संशयितरित्या इमारतीतून बाहेर पडताना आढळली. तिच्यावर संशय आल्याने सीआयएसएफ कर्मचाऱ्याने सदर महिलेला सिक्योरिटी चेक पॉईंटवर नेले. येथे एएसआय प्रियंका मीना यांनी तिची झडती घेतली. यावेळी सदर महिलेजवळ १००-१०० ग्रॅमचे २४ गोल्ड बार आढळून आले. या महिलेने हे सोने एका पट्ट्याच्या सहाय्याने लपविले होते, तिच्याकडून हे सोने जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने वॉशरुममध्ये एका महिलेने आपल्याला हे सोने दिल्याचे सांगितले.