नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी येशू ख्रिस्ताच्या उदात्त विचारांची आठवण करून दिली.
मोदींनी ट्विटरवरून नाताळच्या शुभेच्छा दिल्या. नाताळच्या शुभेच्छा! या शुभदिनी आपण येशू ख्रिस्ताच्या उदात्त विचारांना लक्षात आणले पाहिजे. त्यांनी आयुष्यभर सेवा आणि करूणेचा प्रसार केला. तसेच, आयुष्यभर त्यांनी मानवी दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले. येशू ख्रिस्ताची शिकवण ही जगभरातील करोडो लोकांना प्रेरणा देते, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.