महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ख्रिश्चन मिशेल राहुल गांधींचे 'शकुनी मामा' - योगी - loksabha election 2019

'कालपर्यंत सप आणि बसप एकमेकांशी भांडत होते. आज बसप अध्यक्ष मायावती सप नेत्यांसह एकाच मंचावर येत आहेत. याचे श्रेय केवळ भाजपलाच जाते. या दोघांनी एकाच मंचावर येण्याइतके सुरक्षित वातावरण भाजपने निर्माण केले आहे,' असा दावा योगींनी केला आहे.

योगी आदित्यनाथ

By

Published : May 15, 2019, 1:12 PM IST

बल्लिया - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल हा राहुल गांधींचा 'शकुनी मामा' असल्याची टीका केली आहे. देशात काहीही पेचप्रसंग निर्माण झाला की, राहुल गांधी इटलीला जातात, असा दावा योगींनी केला आहे. यामुळे त्यांनी तेथेच जाऊन मते मागावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

योगींनी प्रियांका गांधींना 'शहजादी' असे संबोधले आहे. 'देशात काहीही पेचप्रसंग निर्माण झाला की, राहुल गांधी आणि त्यांची बहीण इटलीला जातात. त्यांना या देशाशी काहीच कर्तव्य नसेल, तर त्यांनी इटलीलाच जाऊन मते मागावीत,' असे ते म्हणाले. योगींनी मंगळवारी उत्तर प्रदेश येथे पाठोपाठ पाच सभा घेतल्या. त्यांनी लोकांना भाजपला मते देण्याचे आवाहन केले. त्यांनी काँग्रेससह सप आणि बसपवरही हल्ला चढवला.

'कालपर्यंत सप आणि बसप एकमेकांशी भांडत होते. सपचे गुंड बसप कार्यकर्त्यांना मारहाण करत होते. आज बसप अध्यक्ष मायावती सप नेत्यांसह एकाच मंचावर येत आहेत. याचे श्रेय केवळ भाजपलाच जाते. या दोघांनी एकाच मंचावर येण्याइतके सुरक्षित वातावरण भाजपने निर्माण केले आहे,' असा दावा योगींनी केला आहे. तसेच, पश्चिम बंगालमध्ये अद्याप सभा घेण्याची परवानगी मिळाली नसली तरी, तेथे जाणार असल्याचेही योगींनी यांनी म्हटले आहे.

'ख्रिश्चन मिशेल इटलीचा रहिवासी असून तो ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहाराचा ब्रोकर आहे. काँग्रेसने अशा प्रकारच्या ब्रोकर्सना नेहमीच पाठिंबा दिला आहे. मागच्या दाराने इटलीला पळून जाता यावे, यासाठी काँग्रेसने केलेली ही योजना आहे. मात्र, आता मोदीजी आले आहेत. त्यांनी या 'मामा'ला इटलीतून भारतात आणले. काँग्रेस त्यांच्या कुटुंबाशी नेहमीच प्रामाणिक आहे. देशातील नागरिकांशी नाही. ते देशातील नागरिकांपेक्षाही दहशतवाद्यांशी अधिक प्रामाणिक आहेत,' असे आरोपही योगींनी यावेळी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details