लंडन - बँकेला ९ हजार कोटींचा चुना लाऊन परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. वेस्ट इंडिजचा धडकेबाज फलंदाज ख्रिस गेलने मल्ल्याची लंडनमध्ये भेट घेतली. गेलने या भेटीचे फोटे सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तर मल्ल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट केले आहे.
विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने घेतली विजय मल्ल्याची भेट - chris gayle
बँकेला ९ हजार कोटींचा चुना लाऊन परदेशात फरार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. वेस्ट इंडिजचा धडकेबाज फलंदाज ख्रिस गेलने मल्ल्याची लंडनमध्ये भेट घेतली.
ख्रिस गेलने घेतली विजय मल्ल्याची भेट
मल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, गेल्या वर्षभरापासून मी बँकांना पैसे देण्यास तयार आहे. मात्र, बँका पैसे का घेत नाहीत हे त्यांनाच विचारा आणि मग नेमका चोर कोण ते ठरवा. इंग्लंडमध्ये सध्या विश्वकरंडक स्पर्धेचा थरार सुरू आहे. वेस्ट इंडिज संघाचे स्पर्धेत आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.