नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात पश्चिम बंगालमधील 5 मजूरांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावे, अशी विनंती त्यांनी पत्रामध्ये केली आहे.
काश्मीरमधील कुलगाममध्ये मंगळवारी बंगालमधील पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्मीरला पाठवावे. याचबरोबर मृतकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी अशी विनंती चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे केली आहे.