चित्तूर (आंध्र प्रदेश) -चित्तूर जिल्ह्यात पाण्याचे अतिशय कमी स्त्रोत आहेत. त्यामुळे, येथील शेती ही ठिबक व सेंद्रीय पद्धतीवर अवलंबून आहे. अशा या परिसरात शेती करणे खरचं एक आव्हान आहे. हीच परिस्थिती पाहत विशाला रेड्डी नामक तरुणीने येथे मिलेट बँकेची सुरुवात केली.
शेतीसह पिकांसाठीही फायदेशीर ठरयेत चित्तूरमधील चित्तूर जिल्ह्यातील कुप्पमजवळच्या एमकेपुरममध्ये ही मिलेट बँक आहे. या गावाशी नाते जुळून असल्याने विशाला यांनी येथे ही बँक स्थापन केली. आधी त्या हैदराबादबाहेरील उद्योजकांना प्रशिक्षण द्यायच्या. मात्र, आता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सहयोग करण्याच्या उद्देशाने त्या मूळगावी परतल्या आहेत. जे शेतकरी पूर्वी बार्ली, बाजरी, भगर आणि बर्नयार्डसारख्या पिकांचे उत्पादन घेत होते ते हळूहळू व्यावसायिक पिकांवर आपले लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याच्यावर उपाय म्हणूनच विशाला यांनी या बँकेची स्थापना केली.
मिलेट बँकेच्या व्यवस्थापकांनी या परिसरातील ५० शेतकऱ्यांना तृणधान्ये लावण्यास उद्युक्त केले. पाण्याचे स्त्रोत कमी असलेल्या ठिकाणी कशाप्रकारे उत्पन्न घेता येईल यासाठी कार्यशाळा घेणे सुरू केले. या सोबत अनुभवी शेतकऱ्यांची पद्धत आणि कार्यशैली नव्या शेतकऱ्यांसाठी कसे फायदेशीर ठरेल याबाबतही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकरीही जैवीक पद्धतीने केलेल्या शेतीतून उत्पन्न मिळवण्याकरता कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार वाटचाल करत आहेत. तर, मिलेट बँकही शेतकऱ्यांच्या या प्रयत्नाची पूर्ण परतफेड कशी होऊ शकेल याकरता प्रयत्नशील आहे.
या उपक्रमांतर्गत एक प्रयोग म्हणून सध्या 25 एकरांवर बाजरीची लागवड करण्यात आली आहे. उत्पादक संघाची सदस्यता देऊन शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट विकता यावे, ही या बँकेची योजना आहे. या माध्यमातूल शेतातील विविध प्रकारची साधनं आणि बियाणांचे प्रदर्शन करण्यात आले असून त्यासाठी आणखी जनजागृती करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत.
विशाला यांनी मिलेट बँकेची स्थापना करून शेतकऱ्यांची मदत करण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. एक-मेकांपासून दुरावलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने बाजरीची शेती करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना एकवटले. आपल्या मूळ गावातून जे काही शिकलोय त्याचीच परतफेड या माध्यमातून करत असल्याचे समाधान विशाला यांच्या चेहऱ्यावर झळकते. सोबतच शेतकऱ्यांनी स्वत:ला आत्मनिर्भर आणि प्रगतीशील बनवावे याकरता मिलेट बँकेने आपल्या सेवांचा विस्तार करण्यासही सुरुवात केली आहे.