पाटणा- महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी चिराग पासवान यांनी केली आहे. चिराग पासवान हे लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. 'महाराष्ट्रात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय राहतात. महाराष्ट्राला महाराष्ट्र बनविण्यात उत्तर भारतीयांचे मोठे योगदान आहे. तेथे उत्तर भारतीय सुरक्षित नाहीत. त्यामुळे मी चिंतेत आहे', असे चिराग पासवान म्हणाले. ईटीव्ही भारतशी त्यांनी खास चर्चा केली.
'दोन महिने होऊन गेले, सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास लागला नाही. तोसुद्धा बिहारमधील होता. या प्रकरणात महाराष्ट्र पोलीसांना दोन महिन्यांत एका आरोपीलाही अटक करता आली नाही. कोणावर एफआयआरही दाखल करण्यात आली नाही. महाराष्ट्रातील स्थिती पाहता तेथे राष्ट्रपती राजवट लागू करायला हवी, असे मत चिराग पासवान यांनी व्यक्त केले.