चंदिगड - सैन्याची तुकडी व सामानाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या चिनूक हेलिकॉप्टर्सची एक तुकडी आजपासून हवाई दलात रूजू झाली आहे. चंदिगड येथील हवाई दलाच्या तळावरील बेस रिपेअर डेपो येथे याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे चीफ आर. नांबियार आदी यावेळी उपस्थित होते.
चिनूक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत; हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ
भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आज ४ चिनुक हेलिकॉप्टर्सची भर पडली आहे. अमेरिकन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर मुख्यत: जवानांच्या तुकडीची व सामानाची वाहतूक करण्यासाठी केला जातो. चंदिगड येथील हवाई दलाच्या तळावर याचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला.
भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात आज ४ चिनुक हेलिकॉप्टर्सची भर पडली आहे. अमेरिकन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर मुख्यत:जवानांच्या तुकडीचीव सामानाची वाहतूक करण्यासाठी केला जातो. चंदिगड येथील हवाई दलाच्या तळावर याचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. यावेळी हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे चीफ आर. नांबियार आदी उपस्थित होते. लोकसभेच्या निवडणुकांमुळे देशभर आचारसंहिता असल्याने संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत.
चिनुक हेलिकॉप्टर ठरणार वरदान -
- अमेरिकेने पाकिस्तानात ओसामा बिन लादेन विरूध्दच्या कारवाईत याच हेलिकॉप्टरचा वापर केला होता.
- जगभरातील १९ देशांच्या हवाई दलात सध्या चिनूकचा समावेश.
- अतिदुर्गम व डोंगर प्रदेशात कर्तव्यास सक्षम असे हे हेलिकॉप्टर आहे.