महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर, तामिळनाडूमध्ये घेणार मोदींची भेट - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी  भारत दौऱ्यावर येणार आहेत.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी  भारत दौऱ्यावर

By

Published : Oct 7, 2019, 5:07 PM IST

नवी दिल्ली - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते तमिळनाडूमधील महाबलीपूरम येथे भेट घेतील.


शी जिनपिंग यांचे भारतामध्ये शुक्रवारी दुपारी १ : ३० वाजता आगमन होईल. त्यानंतरचे २४ तास ते तामिळनाडूमध्ये असणार आहेत. दुसऱ्या शिखर संमेलनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चार बैठका होणार असून त्यांचा कालावधी तब्बल ५ तासांचा असणार आहे.


काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर चीनने पाकिस्तानला पाठींबा दिला होता. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत नियंत्रण रेषेजवळील भागात शांतता कायम ठेवणे आणि दोन्ही देशादरम्यान असलेले व्यावसायिक संबंध आधिक मजबूत करण्यावर भर असणार आहे.


यापूर्वी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. याचबरोबर मोदींनी त्यांच्यासोबत आपला वाढदिवसदेखील साजरा केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details