तिरुवनंतपुरम - तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई शहरातील अन्नमालई टेकड्यांमध्ये एका वस्तीतील गुहेत एक 35 वर्षीय चिनी नागरिक आढळला आहे. त्या व्यक्तीला प्रशासनाने एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
तामिळनाडूमध्ये सापडला एक चिनी नागरिक , कोरोना अहवाल निगेटिव्ह - Tamil Nadu news
तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई शहरातील अन्नमालई टेकड्यांमध्ये एका वस्तीतील गुहेत एक 35 वर्षीय चिनी नागरिक आढळला आहे
![तामिळनाडूमध्ये सापडला एक चिनी नागरिक , कोरोना अहवाल निगेटिव्ह Chinese man hiding in Annamalai cave, admitted to isolation ward](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6834660-534-6834660-1587150053618.jpg)
यांग रुई असे त्या व्यक्तीचे नाव असून 20 जानेवरीला यांग हे अरुळमीगु अरुणाचलेश्वर मंदिरात पूजा करण्यासाठी तिरुवन्नमलाई येथे आले होते. मात्र, स्थानिक लॉजने त्याला राहण्यास नकार दिल्याने गुहेत राहत होते. हे वन अधिकाऱ्यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी यांग यांना रुग्णालयात दाखल केले.
यांग यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. शहरातील रामना महर्षी रंगम्मल रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के.एस. कंदसमी यांनी सांगितले.