कुल्लू - जगभरासह भारतातही कोरोना संसर्गाची खळबळ माजली असतानाच दुसरीकडे चीन भारताच्या सीमाक्षेत्रात घुसखोरी करत असल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील लाहौल-स्पीती जिल्ह्यात चिनी हेलीकॉप्टर दिसून आले. गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा अंतरराष्ट्रीय सीमेवरुन १२ किमी आतपर्यंत या हेलीकॉप्टरने घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. सिक्कीमनंतर आता हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीतीमार्गे या चिनी हेलीकॉप्टरनी भारतीय सीमेच्या आत १२ किमीपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती आहे.
चिनी हेलिकॉप्टरची हिमाचल प्रदेशच्या सीमेमार्गे १२ किमी आतपर्यंत घुसखोरी, सुरक्षा यंत्रणेत अलर्ट - हिमाचल प्रदेश चीनी हेलीकॉप्टर बातमी
हिमाचल प्रदेशच्या लाहौल-स्पीती जिल्ह्यातील सुमडो पोलीस चेक पोस्टजवळ काही चिनी हेलिकॉप्टर दिसून आले. याबाबत पोलिसांनी सैन्य, आयबी, आयटीबीपी आणि अन्य सुरक्षा संस्थांना याची माहिती दिली आहे.
हे चिनी हेलीकॉप्टर सामरिक दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या लाहौल-स्पीती जिल्ह्यातील सुमडो पोलीस चेक पोस्टजवळ काही चिनी हेलिकॉप्टर दिसून आले. याबाबत पोलिसांनी सैन्य, आयबी, आयटीबीपी आणि अन्य सुरक्षा संस्थांना याची माहिती दिली. या सुचनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीमेवरील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. चिनी हेलीकॉप्टर गेल्या दीड महिन्यात दोनदा अत्यंत कमी अंतरावर उड्डाण भरत असल्याचे दिसून आले. यामध्ये पहिली घटना ही एप्रिल महिन्याच्या शेवटची आहे. तर दुसऱ्यांदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या हेलीकॉप्टरनी हिमाचल प्रदेशच्या सीमेवरुन १२ किमी आतपर्यंत उड्डाण केल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही उड्डानावेळी परतत असताना हे हेलीकॉप्टर तिबेटच्या दिशेने निघून गेल्याचेही आढळून आले. अशी माहिती लाहौल-स्पीतीचे एसपी राजेश धर्माणी यांनी लष्करासह अन्य सुरक्षा एजन्सींना दिली.
चीनने याआधीही अशाप्रकारे घुसखोरी केल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यात सिक्कीमध्ये भारत आणि चिनी जवानांमध्ये टक्कर झाल्याची बातमी आली होती. एका अहवालानुसार उत्तर सिक्कीममध्ये भारत आणि चिनी जवानांमध्ये झडप झाल्याची माहिती समोर आली होती. यामध्ये दोन्ही देशातील जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, नंतर हे प्रकरण मिटले होते. याआधी काही वर्षांपूर्वीदेखील डोकलामचा वादही असाच चिघळला आणि ताणला गेला होता. तर, यावेळेसदेखील चीनने हिमचल प्रदेशच्या सीमेवरील भागात हेलिकॉप्टर पाठवून घुसखोरी करत पुन्हा एकदा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.