नवी दिल्ली- चीन आणि भारताचे सैनिक सीमेवर अमाने-सामने उभे ठाकले असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. सध्याच्या स्थितीत पंतप्रधान गायब झाले असल्याची गांधींनी टीका केली.
'चीनने आपला भूभाग घेऊनही पंतप्रधान शांत' - Military Standoff
राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले की, चिनी आतमध्ये चालत आले आहेत. त्यांनी आपला लडाखमधील भूभाग घेतला आहे. असे असले तरी पंतप्रधान हे शांत आहेत. या प्रसंगातून ते गायब आहेत.
राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले की, चिनी देशाच्या हद्दीत आले आहेत. त्यांनी आपला लडाखमधील भूभाग घेतला आहे. असे असले तरी पंतप्रधान मात्र शांत आहेत. या प्रसंगातून ते गायब आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी यापूर्वीही पूर्व लडाखमधील सीमावादावर मोदी सरकारला प्रश्न उपस्थित केले होते.
चीनच्या सैनिकांनी लडाखमधील भारताच्या भूभागावर ताबा मिळविला का, याचे उत्तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्यावे, असा प्रश्न गांधींनी विचारला होता. भारत आणि चीन हे सीमारेषा वादावरील तोडगा काढण्यासाठी 5 जूनपासून चर्चा करत आहेत. येत्या काही दिवसात दोन्ही देशांच्या सैन्यदलात चर्चा होणार आहे.