महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ब्रम्हपुत्रा नदीवरील चीनच्या धरणामुळे पाणीवाद पेटणार - चीन भारत धरण वाद

यारलूंग झँगबो नदी भारतात प्रवेश केल्यानंतर तिला ब्रम्हपुत्रा नावाने ओळखले जाते. तिबेटमधून वाहत येऊन ही नदी बांगलादेश आणि भारतात प्रवेश करते. बांगलादेशनेही या प्रकल्पाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 24, 2021, 12:05 PM IST

Updated : Jan 24, 2021, 12:43 PM IST

हाँगकाँग -ईशान्य भारतातील ब्रम्हपुत्रा नदीला चीनमध्ये यारलूंग झँगबो नावाने ओळखले जाते. या नदीवर मोठे धरण बांधण्याचे नियोजन चीनने केले आहे. मात्र, या धरणामुळे भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही देशात धरण वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यारलूंग झँगबो नदी भारतात प्रवेश केल्यानंतर तिला ब्रम्हपुत्रा नावाने ओळखले जाते. तिबेटमधून वाहत येऊन ही नदी बांगलादेश आणि भारतात प्रवेश करते. बांगलादेशनेही या प्रकल्पाला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे.

पाण्याचे दुर्भिक्ष होण्याची शक्यता -

ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन्ही नद्यांचा उगम हिमालयातील तिबेट भागात आहे. मात्र, तिबेट चीनमध्ये मोडत असल्याने त्याचा गैरफायदा चीनकडून घेण्यात येत आहे. नदीच्या वरच्या भागात म्हणजेच उगम स्थानाजवळ धरण बांधल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जाऊ शकतो. त्यामुळे भारत, बांगलादेशमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष येऊ शकते. तसेच आणीबाणीच्या किंवा युद्धाच्या स्थितीत चीन धरणातून गरज नसल्याने पाणी सोडून नदीच्या खालच्या भागात म्हणजेच भारतात आणि बांगलादेशात कृत्रिम पूर आणू शकतो. यामुळे भारतात भीती व्यक्त केली जात आहे. धरण बांधल्याचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो.

राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका -

चीनने याआधीही तिबेट भागातील नद्यांच्या उगमस्थानी धरणांचे काम केले आहे. मात्र, या प्रकल्पांची माहिती देण्याचे टाळले आहे. जर प्रकल्पाची माहिती दिली नाही तर भारताच्या सुरक्षेलाही धोका होऊ शकतो. चीन जे सांगेल त्यावर भारत विश्वासही ठेवू शकत नाही. कारण, याआधी चीनने भारताला अनेक वेळा खोटी माहिती देऊन धोका दिला आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अनेक घटना या आधी घडल्या आहेत. त्यामुळे ब्रम्हपुत्रा धरण प्रकल्प भारतासाठी धोकादायक ठरू शकतो, असे दिसून येत आहे.

Last Updated : Jan 24, 2021, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details