बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चीनने सीमेवर 'मार्शल आर्ट फायटर' तैनात केले असल्याची माहिती अहवालांतून समोर येत आहे. 15 जूनला सीमेवर झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
चीनमधील पाच नव्या 'मिलिटीया तुकड्या' भारत- चीन नियंत्रण रेषेवर आणण्यात आल्या आहेत. यामध्ये मिक्स्ड मार्शल आर्ट क्लबसह माऊंट एव्हरेस्ट ऑलंपिक टार्च रिले संघातील माजी सदस्यांचा समावेश आहे. तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांना आधी आणण्यात आले, असे वृत्त चिनी लष्कराच्या अधिकृत चायना नॅशनल डिफेन्स न्यूजने दिले आहे.