महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत- चीन सीमेवरील तणाव कमी करण्यास आम्ही तयार - चीनी परराष्ट्र मंत्रालय - cooling down at border NEWS

बदलत्या भूराजकीय सत्तास्थानात अमेरिकेबरोबर चीनचा सत्ता संघर्ष सुरू आहे. या बदलत्या समीकरणात चीन भारताबरोबर युद्धखोरपणे वागत आहे.

भारत चीन सीमा वाद
भारत चीन सीमा वाद

By

Published : Jun 18, 2020, 7:58 PM IST

बीजिंग- सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी (कुलिंग डाऊन) चीन तयार असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आज मान्य केले आहे. सोमवारी(15 जून) रात्री दोन्ही देशाच्या जवानांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात भारताचे 20 जवान मारले गेले. त्यानंतर सीमेवरील परिस्थिती गंभीर बनली आहे.

गलवान व्हॅली परीसरात झालेल्या वादानंतर दोन्ही देश न्याय पद्धतीने यावर तोडगा काढण्यासाठी तयार झाले आहेत, असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजीन आज(गुरुवार) दैनिंदिन पत्रकार परिषदेत म्हणाले. दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेतील तोडग्यावर दोन्ही देशांनी बांधिल राहायला हवे. त्यामुळे लवकरात लवकर परिस्थिती निवळेल आणि सीमा भागात पुन्हा शांतता प्रस्थापित होईल, असे लिजीन म्हणाले.

बदलत्या भूराजकीय सत्तास्थानात अमेरिकेबरोबर चीनचा सत्ता संघर्ष सुरू आहे. या बदलत्या समीकरणात चीन भारताबरोबर युद्धखोरपणे वागत आहे. आशिया खंडात चीनला शह देण्यासाठी अमेरिका भारताचे संबंध वृद्धींगत होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान दगडाने आणि हाताने जवनांमध्ये हाणामारी झाली असून शस्त्रांचा वापर झाला नसल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. भारतीय जवानांनी उकसवल्याने मारामारी झाल्याचा आरोप चीनने केला आहे. तर चीनने नियोजितपणे भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा आरोप भारताने केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details