चीनमधील कम्युनिस्ट राजवटीला ७० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमीत्ताने चीनने भव्य समारंभ आयोजीत केला होता. त्यामध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन सैन्याने भव्य परेड काढली. परेडमध्ये अत्याधुनिक लष्करी यंत्रणेचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामध्ये डीएफ-41 क्षेपणास्त्र आणि डीएफ-१७ या हायपरसॉनिक तंत्रज्ञानाच्या दोन क्षेपणास्त्रांचा समावेश होता. डीएफ-41 क्षेपणास्त्र फक्त ३० मिनिटांमध्ये अमेरिकेला लक्ष्य करू शकते. हायपरसॉनिक, म्हणजे ध्वनीच्या गतीच्या पाचपटपेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारे क्षेपणास्त्र. याचबरोबर गोंजी-११ स्टेल्थ आणि डीआर-८ हे सुपरसॉनिक मानविरहीत ड्रोन देखील प्रदर्शनामध्ये होते. तर एचएसयु-००१ या पाणबुडीचादेखील समावेश होता.
नोव्हेंबर २०१५ मध्ये पीपल्स लिबरेशन सैन्याला राष्ट्रीय संरक्षण आणि लष्करी सुधारणेसाठी आदेश देण्यात आले होते. शी जिनपिंग यांनी सप्टेंबरमध्ये आपले मनुष्यबळ 300,000 ने कमी करण्याचे सांगितले होते. फेब्रुवारी 2016 मध्ये ७ सैनिकी प्रदेशांची पाच थिएटर कमांडमध्ये पुनर्रचना करण्यात आली होती. हा बदल सैन्य अधिक सक्षम बनविण्यासाठी करण्यात आला होता. गेल्यावर्षी प्रशिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी युद्ध अभ्यास करण्याबाबत त्यांनी एक 'आऊट लाईन ट्रेंनिग इव्हॉल्युएशन' पत्रक काढले होते. त्यानुसार चीनी सैन्यात कोणत्या प्रकारच्या कमतरता आहेत. हे जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी जगातील इतर देशांसोबत युद्ध अभ्यास करत असतो.
चीनचा संरक्षण संकुलाचा विकास अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक वर्षी डिफेन्स न्यूजकडून जगातील पहिल्या 100 संरक्षण कंपन्यांची यादी प्रकाशीत केली जाते. 2019 मध्ये या यादीत सहा चिनी कंपन्या पहिल्या 15 मध्ये आहेत. संरक्षण उपकरणांच्या जवळजवळ सर्व क्षेत्रात चीनने आत्मनिर्भरता प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय तंत्रनियंत्रण संस्थेच्या अभ्यासानुसार 2014 आणि 2018 मध्ये चीनच्या पाणबुड्या, युद्धनौका ह्या जर्मनी, भारत, स्पेन, तैवान आणि युनायटेड किंगडम या देशांच्या नौदलांमध्ये समाविष्ट आहेत.
चीन आपले लष्करी क्षमता वाढवत आहे. चीनच्या रूपरेषा आणि त्याच्या अंतिम ध्येयाचा अंदाज येऊ शकत नाही. मात्र, यामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, चीनचा उदय थेट अमेरिकेचा स्पर्धक म्हणून होत आहे. तर, दुसरी गोष्ट अशी की, सेनादलांच्या अधिकारी मंडळाच्या प्रमुखांचे अध्यक्ष ( chairman of the Joint Chiefs of Staff ) जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी 2025 पर्यंत चीन हा अमेरिकेला धोकादायक ठरणार आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या वृत्ताला अमेरिकेतील इतर आधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला होता. याचप्रकारे चीनची प्रगती होत गेल्यास अमेरिका आणि चीनमधील प्रतिस्पर्धा प्रामुख्याने आशियामध्ये निर्माण होईल. यावेळी भारतासारखे देश कोणतीही एक बाजू ( देश) निवडण्यास भाग पडतील.