नवी दिल्ली :भारत-चीन सीमेवरील फिंगर फोर भागामध्ये एक वेगळाच प्रकार दिसून आला आहे. याठिकाणी चीनी सैन्याने ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. विशेष म्हणजे, या लाऊडस्पीकरवरुन चीनी सैनिक चक्क पंजाबी गाणी मोठ्याने वाजवत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवर असलेल्या तणाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जवानांची गस्त वाढवण्यात आली आहे. सीमेवर सध्या २४ तास कडा पहारा ठेवण्यात येत आहे. त्यामुळे, या सैनिकांचे लक्ष विचलीत करण्याच्या दृष्टीने चीनी सैनिक ही नवी युक्ती वापरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो आहे.