नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून परिस्थिती तणावपूर्ण बनली असून दोन्ही देशाचे सैन्य आमने-सामने ठाकले आहेत. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याने सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने कठोर पाऊल उचलत चीनच्या 118 अॅपवर बंदी घातली आहे. भारताच्या या कारवाईने चीनला चांगलाच दणका बसला आहे. चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
अॅप बंदीनंतर चीनचा थयथयाट ; भारताच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - ban chinese mobile apps news
भारताने कठोर पाऊल उचलत चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे. भारताच्या या कारवाईने चीनला चांगलाच दणका बसला आहे. चीनने भारताच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.
'भारताने चीनच्या अॅपवर घातलेली बंदी म्हणजे, चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठा करणाऱ्यांच्या हितांचे उल्लंघन आहे. चीन याबाबत गंभीर असून याचा विरोध करतो, असे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले.
बुधवारी माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून चीनचे कॅमेरा सेल्फी संर्दभातील विविध अॅप, म्युझिक प्लेअर एमपी 3, वेब ब्राऊझर, फोटो गॅलरी, लिविक, व्हीचॅट वर्क आणि व्हीचॅट रीडिंग, अॅपलॉक, केरम फ्रेंड्स या अॅपवर बंदी घातली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर 29 जूनला सरकारने टिकटॉक, यूसी ब्राऊझर, कॅम स्कॅनर अशा 59 चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती.