नवी दिल्ली -लडाखमधील तणावांच्या पार्श्वभूमीवर चीनने तिबेटमध्ये उच्च क्षमतेच्या तोफा तैनात केल्या आहेत. या तोफा 4,600 मीटर उंचीवर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तैनात केल्याने भारताचा बराच भाग त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात येणार आहे.
याच बरोबर चीनने त्यांची 150 लाईट कंबाइन्ड शस्त्राने सज्ज असलेली सैन्याची 77 वी तुकडी तिबेटच्या मिलीटरी डिस्ट्रिक्टमध्ये तैनात केली आहे. चीनने एलएसीवर आपल्या सैन्याची हालचाल वाढवली आहे.