नवी दिल्ली - पाकिस्तानने 20 हजार सैनिक उत्तर लडाख सीमेवर हलवले असून, चीनही काश्मिरमधील दहशतवाद्यांशी संवाद करत असल्याची धक्कादायक बाब सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीन आणि पाकिस्तान एकत्र झाल्याचे समजत आहे. जे की भारतासाठी धोक्याची घंटी असल्याचे मानले जाते. चीनने वेळोवेळी पाकिस्तानला मदत केली आहे. आता पाकिस्तान चीनच्या मदतीला धावून आला आहे. या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तान या देशातील संबंधावर प्रकाश टाकणाऱ्या घटकांवर चर्चा करूया.
चीन आणि पाकिस्तानमध्ये का आहेत मजबुत संबंध?
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापीत झाले आहेत. या मागे आर्थिक, भौगोलिक आणि व्यापार या सारखे महत्त्वाचे कारणं आहेत.
1. भौगोलिक समीपता -
पाकिस्तान आणि चीन या देशांना सीमेवरील वाद सोडवण्यासाठी 1963 लाच पाऊल उचलले आहे. शांततेच्या मार्गाने दोन्ही देशांनी करारावर सह्या केल्या आहेत. गिलीगीट बलटीस्तान आणि पीओके हा भाग क्षिनजांग उयघूर या जोडलेला आहे. दोन्ही देशांनी 523 किमी सीमा त्या करारानुसार वाटून घेतली.
2. पाकिस्तानला असणाऱ्या इतर देशांच्या सीमा -
पाकिस्तानला भारत, अफगानिस्तान, इराण देशाच्या सीमा लागतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानला अरबी समुद्राची किनारपट्टी लागली आहे. दक्षीण, पश्चिम आणि मध्य आशियाच्या या ती महत्त्वाच्या प्रदेशांच्या क्रॉसरोडवर पाकिस्तानचे स्थान आहे. तसेच मध्य-पूर्व देशातील उर्जा संपन्न देशही पाकिस्तानला सोईचे आहेत. याचाच फायदा घेऊन चीनने हात पाय पसरवण्यास सुरुवात केली. 1970 ला काराकोरम या महामार्गाचे कामही चीनने या भागात सुरू केले.