महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये दिवे लावण्याची जोरदार तयारी; लहानग्यांनी स्वत: बनवले दिवे

कोरोनाच्या गंभीर संकटाशी लढताना मला आपल्या सर्वांची 9 मिनिटे हवी आहेत. तेव्हा येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करून तेलाचे दिवे लावण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

children made a deepak
दिल्लीमध्ये दिवे लावण्याची जोरदार तयारी; लहानग्यांनी स्वत: बनवले दिवे

By

Published : Apr 5, 2020, 6:32 PM IST

Updated : Apr 5, 2020, 8:33 PM IST

नवी दिल्ली -प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिवे लावण्याचे आवाहन केल्यानंतर, देशभरामध्ये याची जोरदार तयारी सुरू आहे. दक्षिण दिल्लीच्या भाटी माइंस गावामध्ये लहान मुलींनी घरामध्येच बसूनच हाताने दिवे बनवले आहेत. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना या चिमुकल्यांनी सांगितले, की सर्वांनी संचारबंदीचे पालन करत, घरी राहून मोदींनी सांगितल्याप्रमाणे 9 वाजता वीज बंद करून दिवे लावावेत.

दिल्लीमध्ये दिवे लावण्याची जोरदार तयारी; लहानग्यांनी स्वत: बनवले दिवे
पंतप्रधानांचे आवाहन -

कोरोनाच्या गंभीर संकटाशी लढताना मला आपल्या सर्वांची 9 मिनिटे हवी आहेत. तेव्हा येत्या रविवारी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता केवळ 9 मिनिटांसाठी आपल्या घरातील विजेचे दिवे बंद करा आणि गॅलरी, घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती वा मोबाईलचे फ्लॅशलाईट लावून सामूहिक शक्तीचे दर्शन घडवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Last Updated : Apr 5, 2020, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details