निवाडी - गेल्या चार दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाच वर्षांच्या प्रल्हादाचा मृत्यू झाला आहे. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रल्हादाला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावात बुधवारी सकाळी बोअरवेलमध्ये पडलेल्या प्रल्हाद नावाच्या मुलाला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.
सुमारे 90 तासांच्या संघर्षानंतर सैन्य आणि प्रशासनाला प्रल्हादाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. प्रल्हादा वाचविण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. तर राज्यातील लोकही प्रल्हादासाठी प्रार्थना करीत होते. बोरवेलमधून बाहेर काढल्यानंतर प्रल्हादाला डॉक्टरांच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. जेथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
घटनेचा पहिला दिवस -
बुधवारी निवाडीच्या पृथ्वीपूर सैतपुरा गावात पाच वर्षांचा प्रल्हाद बोअरवेलमध्ये पडला होता. माहिती मिळताच पोलिसांसह सैन्यदलही प्रल्हादाला वाचवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. बोअरवेल जवळ बोगदा बनवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आले.
प्रल्हाद बोअरवेलमध्ये कसा पडला ?
बुधवारी सकाळी 9.40 वाजता प्रल्हादा बोअरवेलमध्ये पडला. बोअरवेल झाकलेला होता. मात्र, प्रल्हादाने तो उघडल्यानंतर तो त्यात पडला. घटनेनंतर प्रल्हादला वाचवण्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिकाऱ्यांनी बोअरवेलमध्ये कॅमेरा टाकून प्रल्हादाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
ऑक्सिजन पुरवला गेला -
जिल्हाधिकारी आशिष भार्गव आणि एसपी वाहिनी सिंह घटनास्थळी पोहोचले होते. बोअरवेलमधून प्रल्हादच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून प्रल्हादाला सतत ऑक्सिजन पुरविला जात होता. सैन्य आणि एनडीआरएफकडून प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
मुख्यमंत्र्यांच टि्वट -