लखनऊ- खेळताना पाण्याच्या बादलीत बुडून २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेश येथील सलेमपूर (ता. सौरिख, जि. कन्नौज) येथे घडली. माही देवेंद्र बाथम असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
पाण्याच्या बादलीत बुडून दोन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू - bucket
घरात खेळताना पाण्याच्या बादलीत बुडून २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेश येथील सलेमपूर (ता. सौरिख, जि. कन्नौज) येथे घडली. माही देवेंद्र बाथम असे त्या चिमुकलीचे नाव आहे.
मृत माही
घरात माहीची आई रेश्मा ही भांडे धुवत होती. यावेळी माही तेथे खेळत होती. भांडी धुतल्यानंतर ती भांडे घरात ठेवण्यासाठी रेश्मा गेल्या. भांडे ठेवून आल्यानंतर पाण्याच्या बादलीत माहीचे तोंड गेल्याचे दिसले. हे पाहताच त्यांनी आरडाओरडा करत घरच्या मंडळींना बोलावले. माहीला तात्काळ बादलीतून काढून उपचारासाठी रूग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.