देहराडून -गोरखा रेजीमेंट येथील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपिन रावत डान्स करताना दिसून आले. यासंबंधितचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये बिपिन रावत गोरखाली गाण्यावर गढवाली स्टेप्स करताना दिसत आहेत.
VIDEO : लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा गोरखाली गाण्यावर डान्स, पाहा व्हिडिओ - लष्कर प्रमुख बिपिन रावत डान्स
लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा डान्स करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रावत आपले अधिकारी आणि कुटुंबीयांसोबत गोरखाली गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
बिपिन रावत देशाच्या सुरक्षेसाठी लष्काराला निर्देश देत असतात. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यात देखील त्यांची प्रमुख भूमिका आहे. ते लखनऊमधील गोरखा रेजीमेंट येथील कार्यक्रमामध्ये डान्स करताना दिसून आले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी लष्कराच्या गणवेशामध्येच सहभाग घेतला. यावेळी त्यांनी डान्स करत आपले जवान आणि अधिकाऱ्यांसोबत या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेतला.
व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब तसेच त्यांचे काही अधिकारी देखील दिसत आहे. या सर्वांसोबत बिपिन रावत डान्स करताना कार्यक्रमाचा पुरेपुर आनंद घेत आहेत.