बंगळुरू - काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्या नाट्यानंतर कर्नाटकात सध्या राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. अशा परिस्थितीतही कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत चाचणीसाठी तयार आहेत. कुमारस्वामी यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष के.आर रमेशकुमार यांच्याकडे वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे.
कर'नाटक' : मुख्यमंत्री कुमारस्वामी बहुमत चाचणीसाठी तयार, विधानसभा अध्यक्षांकडे मागितला वेळ - विधानसभा
मला सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे नाही. आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत, असे कुमारस्वामींनी म्हटले आहे.
शुक्रवारी कर्नाटकच्या विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, मी सर्व परिस्थितींचा सामना करण्यासाठी तयार आहे. मला सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे नाही. आम्ही बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत.
बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यानंतर विद्यमान सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचे १३ आणि अपक्ष ३ असे मिळून १६ आमदारांनी राजीनामा दिला आहे. या सर्व आमदारांनी १३ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारचे समर्थन माघारी घेतले आहे. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात २ अपक्षांना नुकतेच मंत्री बनविण्यात आले होते.