महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट - हेमंत सोरेन ने PM मोदी से की मुलाकात

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी  मोदींसोबत त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

By

Published : Jan 11, 2020, 4:43 PM IST

नवी दिल्ली - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोघांची ही पहिलीच भेट होती. यावेळी मोदींसोबत त्यांनी राज्यातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील विकासामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच झारखंडमध्ये आदिवासी विद्यापीठ उभारण्याची त्यांना मागणी केली, अशी माहिती सोरने यांनी माध्यमांना दिली. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्याप्रमाणे पंतप्रधानाची भेट घेणे हा एक राजशिष्टाचाराचा भाग आहे, असेही सोरेन म्हणाले.


यापूर्वीचे सरकार राज्यामध्ये आदिवासी विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करत होते. राज्यापाल द्रौपदी मुर्मूने बहरागोडा या ठिकाणी विद्यापीठ उभारण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर यासंबधीत काही प्रगती झाली नाही.


नुकतंच झारखंड मुक्ती मोर्चा'चे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंड राज्याचे ११ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांना शपथ दिली. हेमंत सोरेन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.एकूण ८१ जागा असलेल्या झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाविरोधात आघाडी असलेल्या जेएमएम-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दलाने एकूण ४७ जागा जिंकल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details