महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरकार बरखास्त केले तरी चालेल पण...पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला खडसावले - Agricultural Reform Bill news

केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी कृषी सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले आहे. या कायद्याला अनेक राज्यातून विरोध होतांना दिसत आहे. आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले.

Punjab news
कॅप्टन अमरिंदर सिंह

By

Published : Oct 20, 2020, 12:30 PM IST

चंदिगढ- केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी कृषी सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले आहे. या कायद्याला अनेक राज्यातून विरोध होतांना दिसत आहे. आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले. विधेयक सादर करतांना अमरिंदर सिंह म्हणाले की, केंद्राने आमचे सरकार जरी बरखास्त केले तरी देखील या शेतकरी विरोधी कायद्याची अमंलबजावणी आम्ही पंजाबमध्ये होऊ देणार नाहीत.

हा कायदा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. या कायद्याविरोधात आंदोेलन करण्याचा शेतकऱ्यांना पूर्ण अधिकार आहे. केंद्र सरकारने या कायद्या संदर्भात लवकरात लवकर तोडगा न काढल्यास संर्घष आणखी वाढू शकतो. असा इशाराही यावेळी अमरिंदर सिंह यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details