महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

INX media case : पी. चिदंबरम यांना धक्का, सीबीआय कोठडीमध्ये 30 ऑगस्टपर्यंत वाढ

आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 26 ऑगस्ट पर्यंतची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांच्यावर आज दिल्लीमधील न्यायलयात सुनावणी झाली.

पी. चिदंबरम

By

Published : Aug 26, 2019, 6:15 PM IST

नवी दिल्ली -आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 26 ऑगस्ट पर्यंतची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांच्यावर आज दिल्लीमधील न्यायलयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीमध्ये 30 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.


माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडीची मुदत आज संपली आहे. यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणीस सुप्रीम कोर्टाने आज नकार दिल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. चिदंबरम यांना न्यायाधीश अजय कुमार कुहाड यांच्यासमोर हजर करण्यात आले.


आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. सीबीआयबरोबरच ईडी देखील या प्रकरणाची चौकशी करीत आहे. त्यामुळे सीबीआयनंतर आता ईडी देखील चौकशीसाठी चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई करु शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details