नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकात्मक ट्विट केल्यामुळे एका पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुद्द्यावरून वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी योगी सरकारला चांगलेच खडसावले आहे.
द वायर या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संपादक सिद्धार्थ वरदराजन यांच्यावर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वरदराजन यांनी आपल्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या रामजन्मभूमी उत्सवातील सहभागाबाबत आक्षेप व्यक्त करत, तबलिघी जमात कार्यक्रम आणि रामजन्मोत्सव यामध्ये ते दुजाभाव करत असल्याचे म्हटले होते.