महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

छत्तीसगड : विद्यार्थ्यांनी केली लाल भेंडीची लागवड, शेती अभ्यासक्रमात समावेश - महासमुंद जिल्हा शेती

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयातंर्गत येणाऱ्या नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क कार्यक्रमात शेती अभ्यासक्रम निवडलेल्या राज्यातील विविध शाळंमधील विद्यार्थ्यांनी लाल भेंडीची लागवड केली आहे.

केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयातंर्गत येणाऱ्या नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क कार्यक्रमात शेतकी अभ्यासक्रम निवडलेल्या राज्यातील विविध शाळंमधील विद्यार्थ्यांनी लाल भेंडीची लागवड केली आहे.

By

Published : Aug 18, 2019, 7:58 PM IST

महासमुंद - केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योग मंत्रालयातंर्गत येणाऱ्या नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क कार्यक्रमात शेती अभ्यासक्रम निवडलेल्या राज्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी लाल भेंडीची लागवड केली आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला आहे.

संबंधित उपक्रम उच्च माध्यमिक सरकारी शालांत अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३६ शाळांमधील शेतकी अभ्यासक्रम निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या लाल भेंडीचे बियाणे आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातून मागवण्यात आले असून याला शास्त्रीय भाषेत अॅबेलमश्च एस्कलेंटस् असे म्हणतात.

लाल भेंडीत कॅलशिअम, व्हिटॅमिन यांसारखी अनेक पोषक तत्त्वे असून विद्यार्थ्यांना फळभाज्यांचे महत्त्व व फायदे कळणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासक्रम प्रशिक्षक दिनेश कुमार सोनी यांनी व्यक्त केले. तसेच या भेंडीतील काही पोषक तत्त्वे गरोदर महिलांसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांनाही यापासून फायदा होत असल्याचे सोनी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details