महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फनी चक्रीवादळ : उत्तर प्रदेश, तामिळनाडूनंतर छत्तीसगडकडून ओडिशाला ११ कोटींची मदत - Chhattisgarh

यापूर्वी उत्तरप्रदेश आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ओडिशासाठी प्रत्येकी १० कोटींची मदत दिली आहे.

फनी

By

Published : May 6, 2019, 11:00 AM IST

नवी दिल्ली - फनी चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका ओडिशाला बसला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बगेल यांनी मुख्यमंत्री मदत निधीतून ओडिशासाठी रविवारी ११ कोटींची मदत जाहीर केली. यापूर्वी उत्तरप्रदेश आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी ओडिशासाठी प्रत्येकी १० कोटींची मदत दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी त्यांच्या राज्यांकडून ओडिशाला मदत देण्याची शुक्रवारी घोषणा केली होती. ३ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारकडून फनी वादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांना तातडीची १ हजार कोटींची मदत जाहीर केली होती.

ओडिशात फनी चक्रीवादळाच्या बळींची संख्या ५ मे अखेर २९ वर पोहोचली आहे. यापैकी केवळ पुरी येथील २१ बळी आहेत. येथे ३ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला होता. मागील २ दिवसांत ओडिशा किनारपट्टीवरील स्थिती अत्यंत गंभीर होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, वीज खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details