रायपूर: एका २२ वर्षीय युवकाने आपल्या सर्व कुटुंबीयांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील मातियारी गावात गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन सूर्यवंशी असे या तरुणाचे नाव आहे. तो मानसिकरित्या अस्थिर होता. गुरुवारी रात्री त्याने आपले वडील रुपदास (४५), आई संतोषी बाई (४०), बहीण कामिनी (१८) आणि दोन भाऊ रोहित (२०), ऋषी (१५) यांची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. त्यानंतर त्याने बाहेर जात एका अज्ञात भरधाव वाहनाखाली आपला जीव दिला.