रायपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक आज बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुकमामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार - छत्तीसगड सुकमा चकमकीत चार नक्षलवादी ठार
जागरगुंडा परिसरातील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने हल्ला चढवला. यावेळी चार नक्षलवादी ठार झाले. चकमक झाल्यानंतर तेथे चार मृतदेह आणि शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आली.
![सुकमामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार सुकमामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12:17:25:1597214845-8388112-495-8388112-1597212508718.jpg)
सुकमामध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार
बस्तर येथील नक्षलविरोधी मोहिमेचे प्रमुख सुंदर राज. पी. यांनी सांगितले की, जागरगुंडा परिसरातील जंगलात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने हल्ला चढवला. यावेळी चार नक्षलवादी ठार झाले. चकमक झाल्यानंतर तेथे चार मृतदेह आणि शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आली.