रायपूर -छत्तीसगड येथील राजनंदगाव एनकाउंटरमध्ये एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. २०१३ साली झिरम घाटी येथील हल्ल्यात नक्षलवाद्यांनी ही रायफल लुटली होती, अशी माहिती एसपी जितेंद्र शुक्ला यांनी दिली. नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची चकमक झाल्यानंतर त्यांच्याकडून चार शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यात या रायफलचा समावेश आहे.
छत्तीसगडच्या झिरम घाटी हल्ल्यातील एके-४७ रायफल नक्षलवाद्यांकडून जप्त - 2013 naxal attack
नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची चकमक झाल्यानंतर त्यांच्याकडून चार शस्त्रे जप्त करण्यात आली. त्यात या रायफलचा समावेश आहे.
छत्तीसगडच्या झिरम घाटी हल्ल्यातील एके-४७ रायफल नक्षलवाद्यांकडून जप्त
एका जंगलात ७ मे रोजी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे जंगल राजनंदगाव येथील अँटी-नक्षल मुख्यालयाच्या जवळ आहे. शस्त्रांसह त्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला असून ४ नक्षलवादी ठार झाले आहेत.