महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दंतेवाडात ३२ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण - दंतेवाडा नक्षलवादी आत्मसमर्पण न्यूज

नक्षली गटांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना पुन्हा समाजात आणने मोठी कठिण गोष्ट आहे. मात्र, दंतेवाडा पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले आहे. त्यांनी सुरू केलेल्या एका मोहिमेमुळे आतापर्यंत १५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Naxals
नक्षलवादी

By

Published : Oct 25, 2020, 7:18 PM IST

रायपूर -छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये ३२ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केले. यामध्ये १० महिलांचाही समावेश आहे. हे सर्वजण बाससोर पोलीस ठाण्यात एकत्र हजर झाले. पोलिसांनी घेतलेल्या पुनर्वसन शिबिरामुळे प्रभावित होऊन नक्षलवाद्यांनी हा निर्णय घेतल्याचे दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी सांगितले.

आत्मसमर्पण केलेल्या ३२ जणांपैकी १९ जण बाकेली गावचे, ४ जण कोरकोट्टी आणि तीघे अनुक्रमे उडनेर, तुमारीगुंडा आणि मत्साई गावातील आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीसांनी त्यांची ओळख उघड केलेली नाही. हे नक्षलवादी 'दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटन' आणि 'क्रांतीकारी महिला आदिवासी संघटन' या दोन संघटनांशी संलग्न आहेत. यातील चौघांवर प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आलेले आहे. या सर्वांच्या नावावर पोलिसांवर हल्ले करणे, गस्तीवर असणाऱया पथकांवार हल्ले करणे, आयईडी ब्लास करणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती पल्लव यांनी दिली.

आत्मसमर्पण केलेल्यांना तत्काळ १० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाच्या पुनर्वसन नियमांनुसार त्यांना पुढील सर्व सुविधाही दिल्या जाणार आहेत. दंतेवाडा पोलिसांनी सुरू केलेल्या 'लोण वरत्तु'(स्थानिक गोंदी भाषेत'घराकडे परत या') या मोहिमेत पोलिसांना यश येत असल्याचे दिसते आहे. पोलीस नक्षलवाद्यांना त्यांच्या पुनर्वसनाची हमी देऊन आत्मसमर्पण करण्यासाठी वारंवार आवाहन करत आहेत.

यावर्षी जून महिन्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दंतेवाडातील एकूण १५० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details