महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दंतेवाडामध्ये 28 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; चौघांवर होते बक्षीस - दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात जिल्हा पोलिस व प्रशासनाला रविवारी मोठा यश मिळाले आहे.

दंतेवाडामध्ये इनाम असलेल्या चार जणांसमवेत 28 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

By

Published : Oct 20, 2019, 9:38 PM IST

दंतेवाडा - छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात जिल्हा पोलीस व प्रशासनाला रविवारी मोठे यश मिळाले आहे. तब्बल 28 नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून जिल्हाधिकाऱ्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यापैकी चौघाजणांवर बक्षीस लावण्यात आले होते.


एका आठवड्यापूर्वी चिकपाल कॅपची स्थापना करण्यात आली आहे. येथे कब्बडी खेळाच्या स्पर्धेदरम्यान ५ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.


दंतेवाडा हा नक्षलग्रस्त भाग आहे. येथे नक्षलवाद्यांनी अनेक मोठे-मोठे स्फोट घडवले आहेत. पोलिसांच्या पुनर्वसनाच्या योजनेला प्रभावित होऊन त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रोत्साहन बक्षीस म्हणूण १०-१० हजार रुपये देण्यात आले आहेत. या सर्व नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होत सामान्य जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली आहे

ABOUT THE AUTHOR

...view details