महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींचा कार्यक्रम झालेल्या स्टेला मॅरिस महाविद्यालयाला नोटीस - congress

या कार्यक्रमावर महाविद्यालयीन शिक्षण संचलनायलाने (डायरेक्टोरेट ऑफ कॉलेजिएट एज्युकेशन) नापसंती व्यक्त केली आहे.'आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राजकीय नेत्याचे चर्चासत्र कसे घेण्यात आले,' याबाबत त्यांच्याकडे विचारणा करून स्पष्टीकरण मागवले आहे.

राहुल गांधी

By

Published : Mar 15, 2019, 8:47 PM IST

Updated : Mar 15, 2019, 9:09 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १३ मार्चला चेन्नईतील स्टेला मॅरिस महाविद्यालयात ३ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. हा कार्यक्रम काँग्रेसच्या दृष्टीने प्रचंड यशस्वी झाला होता. मात्र, आता हा कार्यक्रम आचारसंहिता भंगाच्या कारवाईत सापडण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमावर महाविद्यालयीन शिक्षण संचलनायलाने (डायरेक्टोरेट ऑफ कॉलेजिएट एज्युकेशन) नापसंती व्यक्त केली आहे. त्यांनी प्रादेशिक सहसंचालकांना परिपत्रक जारी केले आहे. 'आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राजकीय नेत्याचे चर्चासत्र कसे घेण्यात आले,' याबाबत त्यांच्याकडे विचारणा करून स्पष्टीकरण मागवले आहे. हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला, याचे स्पष्टीकरण स्टेला मॅरिस महाविद्यालयाकडून येणे अद्याप बाकी आहे.

राहुल यांनी या महाविद्यालयात तरुणांना आगामी निवडणुकांना प्रतिसाद देण्याचे आणि सजग होण्याविषयी आवाहन केले होते. तसेच, निवडणूक प्रचाराच्या अनुषंगानेही त्यांनी संभाषण केले होते. हा कार्यक्रम यशस्वी झाला. मात्र, आता त्यावर आचारसंहिता भंगाचे नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. राहुल यांनी तमिळनाडूत कन्याकुमारी येथील नागेरकोईल येथून लोकसभा निवडणुकांसाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रचारास सुरुवात केली.

राहुल गांधी यांनी तमिळनाडू दौऱयावर त्यांनी स्टेला मॅरिस महाविद्यालयातील तरुणींशी संवाद साधला होता. एका मुलीने राहुल यांना 'हाय सर' असे म्हणत प्रश्न विचारायला सुरुवात केली. इतक्यात राहुल गांधींनी त्या मुलीला मध्येच थांबवत, तुम्ही 'सर' ऐवजी मला राहुल म्हणाल का? असे म्हटले आणि सभागृहात हशा पिकला.

यानंतर त्या मुलीने 'हाय राहुल' म्हणताच सभागृहात उपस्थित मुलींनी एकच गोंधळ केला. यावेळी राहुल गांधी जिन्स पॅन्ट आणि टी-शर्ट या लूकमध्ये दिसून आले होते.

Last Updated : Mar 15, 2019, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details