बरेली - उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना घडली आहे. सॅनिटायजरच्या नावाखाली लोकांच्या अंगावर फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल टाकले आहे. त्यामुळे अनेक जणांत्या डोळ्यांना इजा झाली आहे.
VIDEO : कोरोनापासून बचावासाठी लोकांच्या जीवाशी खेळ; लोकांना घातली केमिकलने अंघोळ.. - सॅनिटायजरच्या नावाखाली लोकांच्या अंगावर फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल टाकले
उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना घडली आहे. सॅनिटायजरच्या नावाखाली लोकांच्या अंगावर फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल टाकले आहे

कोरोनापासून बचावासाठी लोकांच्या जीवाशी खेळ
कोरोनापासून बचावासाठी लोकांच्या जीवाशी खेळ, सॅनिटायजरच्या नावाखाली अंगावर टाकले केमिकल
केमिकल टाकण्यात आलेले लोक हे दिल्ली, नोएडा,हरियाणा, उत्तराखंड या राज्यातून आले होते. रविवारी बरेलीत पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्यांनतर शहरातील बऱ्याच ठिकाणी सॅनिटायझर टाकण्यात आले होते. त्यांनतर बाहेरुन आलेल्या लोकांवरही सॅनिटायझरच्या नावाखाली केमीकल टाकण्यात आले. प्रथम त्या लोकांना डोळे बंद करण्यास सांगितले. त्यांनतर त्यांच्या अंगावर फायर ब्रिगेडच्या माध्यमातून केमिकल टाकण्यात आले.
Last Updated : Mar 30, 2020, 11:59 PM IST