महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनर्थ टळला! छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट लावला उधळून - छत्तीसगड पोलीस

छत्तीसगड राज्याच्या पोलीस ज्वालाग्राही साहित्याचा शोध घेत असताना त्यांनी ठिकठिकाणी खड्डे खोदले. यात त्यांनी मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचा दारूगोळा हस्तगत केला आहे.

अनर्थ टळला! छत्तीसगड पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कट लावला उधळून

By

Published : Sep 22, 2019, 9:36 PM IST

कवर्धा (छत्तीसगड) - जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या नक्षल प्रभावीत भागातून शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि इतर स्फोटके हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. छत्तीसगड राज्याच्या पोलिसांनी ज्वालाग्राही साहित्याचा शोध घेत असताना त्यांनी ठिकठिकाणी खड्डे खोदले यात त्यांना ही सामग्री सापडली. हे साहित्य तरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुमाछापर जंगलात सापडल्याची माहिती पोलीस अधिक्षक लालउमेद सिंग यांनी दिली.

हेही वाचा - अल कायदाचा दहशतवादी मोहम्मद कालिमुद्दीन एटीएसच्या ताब्यात

धुमाछापर जंगलातील मागील वर्षी घडलेल्या घटनेत (३१ मे २०१८) पोलीस आणि नक्षली यांच्यात झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी मारला होता. यावेळीही पोलिसांना घातपातापासून नागरिकांना वाचवण्यात मोठे यश आले आहे. १६ सप्टेंबरलाच दहावीच्या विद्यार्थीनीचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी त्यांना मारले होते.

हेही वाचा - #HowdyModi : लोकांची उत्सुकता शिगेला; ट्रम्पदेखील ह्युस्टनसाठी रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details