महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

INX Media case : पी. चिदंबरम, कार्ती, पीटर मुखर्जीवर सीबीआयचे आरोपपत्र

आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावांचा यात समावेश आहे. पी. चिदंबरम याच प्रकरणात तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती.

पी. चिदंबरम, कार्ती, पीटर मुखर्जी

By

Published : Oct 18, 2019, 3:06 PM IST

नवी दिल्ली -आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास विभागाने (सीबीआय) शुक्रवारी दिल्ली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात पी. चिदंबरम, कार्ती चिदंबरम, पीटर मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावांचा समावेश आहे. यावर येत्या सोमवारी (ता. २१) सुनावणी होणार आहे.

आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावांचा यात समावेश आहे. पी. चिदंबरम याच प्रकरणात तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. गुरुवारी न्यायालयाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. तर, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक झाली होती. दोन महिन्यांपासून ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत.

विभक्त झालेले पती-पत्नी पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांचीही नावे आरोपपत्रात आहेत. हे दोघे सध्या मुंबईच्या आर्थररोड आणि भायखळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणात सीबीआय न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरु आहे. इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडियाची संचालक होती. त्यामुळे त्यांच्यावरही कथिरीत्या या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा आरोप आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details