नवी दिल्ली - करोना फैलावावरून वादग्रस्त ठरलेल्या तबलिगी जमातच्या विरोधात पाऊले उचलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज'मध्ये सहभागी झालेल्या 294 परदेशी तबलिगी सदस्यांविरोधात आज गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले आहे.
294 परदेशी तबलिगींविरोधात आरोपपत्र दाखल - Tabligi foreign news
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' मध्ये सहभाग घेतलेल्या 294 परदेशी तबलिगी सदस्यांविरोधात आज गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले.
यापूर्वी गुन्हे शाखेने 82 परदेशी सदस्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. निजामुद्दीन मरकजप्रकरणी आतापर्यंत 900 जमाती सदस्य सापडले आहेत. ज्यांनी पर्यटन व्हिसाच्या माध्यमातून भारतामध्ये प्रवेश केला होता. मात्र, धर्मिक प्रचार करत होते.
व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. यासह, त्यांना काळ्या यादीत टाकले गेले आहे. त्यांनी साथीच्या रोगासंदर्भातील सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघनही केले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचेही त्यांच्याकडून उल्लंघन झाले आहे. तसेच त्यांनी कलम 144 सीआरपीसीच्या आदेशांचे उल्लंघन केले आहे, असे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.