महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; पहिली पूजा पंतप्रधान मोदींच्या वतीने - उत्तराखंड न्यूज

मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिली पुजा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने करण्यात आली. यावेळी मंदिराला १० क्लिंटल फुलांनी सजविण्यात आले होते.

kedarnath temple
केदारनाथ मंदिर

By

Published : Apr 29, 2020, 10:33 AM IST

डेहराडून- रुद्रप्रयाग येथील केदारनाथ मंदिराचे दरवाजे(कपाट) मुख्य पुजारी शिव शंकर लिंग यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. आज(बुधवारी) सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मंदिराचे दरवाजे खोलण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता फक्त १६ जण दरवाजा उघडताना उपस्थित होते. मात्र, भाविकांना दर्शन घेण्यास परवानगी देण्यात आली नाही.

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर पहिली पूजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी मंदिराला १० क्लिंटल फुलांनी सजविण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. यावेळी मंदिर प्रशासनाील ठराविक सदस्य आणि पोलीस उपस्थित होते.

सरकारी निर्देशानुसार चारधाम यात्रा बंद ठेवण्यात आली आहे. फक्त पूजा करण्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details