उत्तराखंड- शिख धर्मीयांचे पवित्र तीर्थस्थळ असलेल्या हेमकुंड साहिब यात्रेवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला आहे. यामुळे संबंधित धर्मस्थळावर जाणाऱ्या मार्गावरदेखील मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय. धर्मस्थळाच्या अन्य व्यवस्थांवरदेखील प्रभाव पडला आहे. आमतौरच्या मार्गावर दरवर्षी एप्रिल महिन्यापर्यंत बर्फ हटवण्याचे कार्य सुरू होते. मात्र, लॉकडाऊनमुळे यामध्ये अडचणी येत आहेत. दरवर्षी सेनेचे जवान तसेच जिल्हा प्रशासनातर्फे हे कार्य पार पाडण्यात येते.
हेमकुंड साहिब तीर्थस्थळावर बर्फाचे वलय! - Changes in Hemkund Sahib Yatra dates
हेमकुंड गुरुद्वारा प्रबंधन समितीचे प्रबंधक सरदार सेवा सिंग यांनी घांघरिया विभागाच्या पुढील प्रांतात मोठ्या प्रमाणात बर्फाच्छदित प्रदेश तयार झाल्याची माहिती दिली. रस्त्यात मोठ्या प्रमाणात हिमनग तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३ मेनंतर प्रशासनाच्या निर्देशानुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. सध्या कोरोनामुळे तीर्थस्थळ समितीने कोणताही निर्णय घेतलेला नसून लॉकडाऊन संपल्यावर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.