मुंबई -भारताच्या मिशन चांद्रयान-२ मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासांचा वेळ राहिला आहे. १४ जुलैला मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात उड्डाण घेणार आहे. लॉन्चिंग नंतर ५४ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. यासंबंधी चांद्रयान-२ मोहिमेची तयारी कशाप्रकारे करण्यात आली. याचा व्हिडिओ इस्रोकडून प्रदर्शित करण्यात आला.
इस्रोने प्रदर्शित केलेल्या व्हिडिओमध्ये चांद्रयान-२ मोहिमेची तयारी दाखवण्यात आली आहे. यामध्ये शक्तीशाली रॉकेट GSLV मार्क-३ च्या जोडणीपासून शास्त्रज्ञांनी केलेली यानाची जोडणी दाखवण्यात आली आहे.
चांद्रयान-२ मोहिमेची तयारी सन २००८ मध्ये पाठवलेल्या चांद्रयान-१ मध्ये चंद्राच्या कक्षेत फिरणारे ऑरबिट लावण्यात आले होते. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करणारे रोव्हर त्यावेळी त्यात नव्हते. यावेळी मात्र या यानाचे रोव्हर चंद्रावर उतरणार आहे. आता चांद्रयान-२ मोहिमेमधले रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्ये उलगडता येणार आहेत. चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यावर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होणार आहे. त्यानंतर लँडर १५ मिनिटांमध्ये चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्स असणार आहेत. अशाचप्रकारे रोव्हर देखील अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असेल. ऑर्बिटर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर संबंधिची माहिती पाठवण्याचे काम करतील.
चांद्रयान-२ विशेष
-प्रक्षेपण झाल्यानंतर काही दिवस ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहील.
- भारताने पैशांची बचत करण्याकरता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग केलेला आहे.
-लँडरचे नाव विक्रम ठेवले आहे. जे विक्रम साराभाई यांच्या नावावर आहे. साराभाई भारतीय अंतराळ संशोधनात जनक म्हणून गणले जातात.