महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' कारणाने लँडर विक्रमशी संपर्क तुटला, चांद्रयान-१ च्या संचालकांची मीमांसा - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)

'याआधी लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरद्वारे काही सिग्नल्स लँडरकडे पाठवण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत लँडर ते सिग्नल्स स्वीकारतो की नाही, हे पहावे लागेल. सध्या एकाच बाजूने संदेश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोही केवळ ५ ते १० मिनिटांसाठीच होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे संपर्क करणे किचकट आहे. मात्र, ते करण्यास आमचे शास्त्रज्ञ सक्षम आहेत,' असे अण्णादुराई म्हणाले.

मायलस्वामी अण्णादुराई

By

Published : Sep 9, 2019, 1:35 PM IST

चेन्नई -चंद्राच्या पृष्ठभागावरील अडथळ्यांमुळेच लँडर विक्रमकडून सिग्नल स्वीकारणे थांबले असावे, अशी शक्यता चांद्रयान-१ चे संचालक मायलस्वामी अण्णादुराई यांनी रविवारी म्हटले आहे.

'आम्हाला लँडरचे चंद्राच्या पृष्ठभागावरील सध्याचे ठिकाण सापडले आहे. आता आम्हा त्याच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जेथे लँडर उतरला आहे, ती जागा सॉफ्ट लँड करण्यासाठी फारशी अनुकूल नसण्याचा संभव आहे. तेथे काही अडथळे असण्याची शक्यता आहे. त्यांच्यामुळे आम्हालाही लँडरशी संपर्क करण्यात अडचणी येत आहेत,' असे अण्णादुराई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Chandrayaan-2 : विक्रम लँडर मिळाले, लवकरच संपर्क होण्याची शक्यता - डॉ. के. सिवन

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्याच्या काही काळ आधी लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. चांद्रयान-२ मधील महत्त्वाच्या तीन भागांपैकी 'विक्रम लँडर' एक होता. शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटरवर असताना बंगळुरु येथील ग्राऊंड स्टेशनशी त्याचा संपर्क तुटला होता. यामुळे विक्रम लँड झाला किंवा नाही हे समजले नव्हते. त्यानंतर चांद्रयान-२ चा आणखी एक भाग ऑर्बिटर चंद्रभोवती परिभ्रमण करत आहे. त्याच्या माध्यमातून विक्रम लँडर उतरलेले ठिकाण सापडले आहे. ऑर्बिटरमध्येही संपर्कयंत्रणा आहे. त्याच्या माध्यमातून विक्रम लँडरशी संपर्क साधला जाणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहे.

'याआधी लँडरशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरद्वारे काही सिग्नल्स लँडरकडे पाठवण्यात आले. मात्र, सद्यस्थितीत लँडर ते सिग्नल्स स्वीकारतो की नाही, हे पहावे लागेल. आतापर्यंत नेहमी ऑर्बिटर आणि लँडर दरम्यान संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती. मात्र, सध्याच्या प्रयत्नात एकाच बाजूने संदेश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तोही केवळ ५ ते १० मिनिटांसाठीच होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे संपर्क करणे किचकट आहे. मात्र, ते करण्यास आमचे शास्त्रज्ञ सक्षम आहेत,' असे ते म्हणाले.

हेही वाचा - पुढील १४ दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल - के. सिवन

रविवारी इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी इस्रोला लँडर विक्रमचे सध्याचे ठिकाण सापडल्याचे सांगितले होते. मात्र, लँडरशी संपर्क झाला नसल्याचे सांगत त्यांनी पुढील १४ दिवस हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याचे म्हटले होते. चांद्रयानाने २२ जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून उड्डाण केले होते. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर यानाने १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने प्रस्थान केले होते. या मोहिमेच्या शेवटच्या काही मिनिटांपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते. लँडरशी संपर्क तुटल्याची घटना वगळता ही संपूर्ण मोहीम ९० ते ९५ टक्के सफल राहिल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

संपूर्ण देशाने चांद्रयानाचा हा प्रवास पाहिला. तसेच, लँडर विक्रमशी संपर्क तुटण्याच्या घटनेनंतर सर्व शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभे असल्याचेही सांगितले.

हेही वाचा - इस्रोच्या चांद्रयान मोहिमेवर नासाची प्रतिक्रिया...

ABOUT THE AUTHOR

...view details