बंगळुरु- चांद्रयान २ मिशनचा ऑर्बिटर व्यवस्थितपणे काम करत आहे. ऑर्बिटरवर लावण्यात आलेले ८ ही उपकरणे व्यवस्थितपणे काम करत आहेत. मात्र, विक्रम लँडरशी अद्यापही संपर्क साधू शकलो नाही, आमचे पुढील लक्ष्य गगनयान आहे, असे इस्रो संचालक के. सिवन यांनी सांगितले आहे.
विक्रम लँडरशी संपर्क नाहीच, आता पुढील लक्ष्य गगनयान मोहीम - के. सिवन
ऑर्बिटरवर लावण्यात आलेले ८ ही उपकरणे व्यवस्थितपणे काम करत आहेत. मात्र, विक्रम लँडरशी अद्यापही संपर्क साधू शकलो नाही - सिवन
चंद्रापासून अवघ्या २ किमी दुर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे चांद्रयान मोहिमेत अडथळा आला. त्यानंतर १४ दिवसात लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे इस्रोने सांगितले होते. मात्र, लँडरशी संपर्क साधण्यात अपयश आले. दरम्यान नासाही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती.
ऑर्बिटरवर बसवण्यात आलेली आठही उपकरणे निटपणे काम करत आहेत. मात्र, लँडरशी संपर्क साधता आला नाही, असे ते म्हणाले. मात्र, आता गगनयान मोहिमेकडे लक्ष्य असेल, असे सिवान म्हणाले.