श्रीहरीकोटा- भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासच बाकी आहेत. 14 जुलै रोजी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात उड्डाण घेणार आहे. लॉन्चिंगनंतर 54 दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहचेल. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे.
काउंटडाऊन..टेन.. नाईन.. वन ... थोड्याच वेळात झेपावणार भारताचे 'चांद्रयान' 2 - रॉकेट GSLV मार्क-३
भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासच बाकी आहेत. 14 जुलै रोजी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात उड्डाण घेणार आहे.
रविवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 ला भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV मार्क-३ च्या मदतीने अवकाशात सोडले जाणार आहे. लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर 14 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. या दरम्यान चांद्रयानाचा वेग अधिकाधिक १० किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी ३ किलोमीटर असणार आहे.
सन 2008 मध्ये पाठवलेल्या चांद्रयान 1 मध्ये चंद्राच्या कक्षेत फिरणारे ऑरबिट लावण्यात आले होते. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारे रोव्हर त्यावेळी त्यात नव्हते. यावेळी मात्र या यानाचे रोव्हर चंद्रावर उतरणार आहे. आता चांद्रयान-२ मोहिमेमधले रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येणार आहेत. चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यावर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होणार, त्यानंतर लँडर 15 मिनिटात चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्स असणार आहेत. अशाचप्रकारे रोव्हर देखील अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असेल. ऑर्बिटर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर संबंधिची माहिती पाठवण्याचे काम करतील.